‘रुग्णसेवा प्रकल्प मिरज’ यांच्याकडून किराणा साहित्याचे वाटप ! 

‘रुग्णसेवा प्रकल्प मिरज’ यांच्याकडून गरजूंना किराणा साहित्याचे वाटप करण्यात येत असतांना

सांगली, ५ सप्टेंबर – सांगलीत कोरोना संसर्गासमवेत महापुराचे संकट दुसर्‍यांदा आले. त्यामुळे उद्योगधंदे, मध्यमवर्गीय कुटुंबांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी या अडचणी लक्षात घेऊन ‘रुग्णसेवा प्रकल्प मिरज’ यांच्याकडून ‘मांझी स्किलींग फाऊंडेशन मुंबई’ यांच्या सहकार्याने ३५ कुटुंबांना नगर वाचनालय येथे किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी उद्योजक दीपक शिंदे, ‘रुग्णसेवा प्रकल्प मिरज’चे डॉ. भालचंद्र साठ्ये, सनित कुलकर्णी, भालचंद्र चितळे, सुहास करंदीकर, शशांक लिमये यांसह अन्य उपस्थित होते.