मुंबई येथे ‘हिंदू एकता दिंडी’त एकवटलेल्या धर्मप्रेमींकडून हिंदु राष्ट्राचा जयघोष !

परात्पर गुरु डॉ. आठवले याच्या जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील १ सहस्र ५०० हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक आणि संप्रदाय अशा २५ संघटनांचा सहभाग होता.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य अवतारी पुरुषाप्रमाणेच ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

जे कुणी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होतील, त्यांचा निश्चित उद्धार होईल, असे मार्गदर्शन सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते १९ मे या दिवशी झालेल्या ‘हिंदू एकता दिंडी’त बोलत होते.

यवतमाळ येथे दुसरे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन !

हिंदु जनजागृती समिती आयोजित दुसरे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन नुकतेच पार पडले. संवैधानिक मार्गाने कृतीशील होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार शहरासह वणी, पुसद, उमरखेड, घाटंजी, कारंजा येथील १६ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केला.

जळगाव येथे हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून धर्मप्रेमींचे संघटन !

सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे छायाचित्र ठेवलेल्या पालखीचे पूजन करण्यात आले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या देखाव्याला उत्कृष्ट पारितोषिक प्राप्त !

अमरावती येथे झालेल्या परशुराम जयंती शोभायात्रेनंतर पारितोषिक वितरण !

यवतमाळ येथे आज  ‘हिंदू एकता दिंडी’ !

दिंडीचा प्रारंभ बाळीवेस, जाजू भवन येथून होणार आहे.

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणे आणि योग्य कृतींसाठी न्याय मिळवणे, हे अधिवक्त्यांचे कर्तव्य ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

आजकाल प्रत्येकच क्षेत्रात भ्रष्टाचार होत आहे, याविरुद्ध लढण्यासाठी आणि योग्य कृतींसाठी न्याय मिळवणे, हे अधिवक्त्यांचे कर्तव्य आहे. अशा अनेक घटनांना सामोरे जाण्यासाठी अधिवक्त्यांनी साधना करणे, स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबविणे अत्यावश्यक आहे.

ईश्वरी अधिष्ठान ठेवून हिंदु राष्ट्राचे कार्य करा ! – पू. संतोषकुमार महाराज

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूंवर होणारे आघात आणि हिंदु राष्ट्राचे होणारे लाभ लोकांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. आता परिस्थिती अनुकूल आहे. आता नाहीतर कधीच नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. त्याग करावा लागणार आहे.

नाशिक येथील हिंदू एकता दिंडीत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा निश्चय !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना नाशिकमधील साधूसंतांकडून दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद !

भक्तांचा उद्धार आणि धर्मसंस्थापना यांसाठी ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती करणारे अन् भगवंताचे सगुण रूप असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…