सनातनचा आश्रम ही हिंदुत्वाची कृतीशील प्रयोगशाळा ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

सुप्रसिद्ध वक्ते आणि पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

हिंदूंचे संघटन आणि हिंदु राष्ट्र यांसाठी अहोरात्र झटणारी एकमेव संस्था, म्हणजे सनातन संस्था होय ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे सनातन संस्थेप्रती गौरवोद्गार !

सनातन संस्थेची ग्रंथसंपदा समाजापर्यंत पोचणे ही काळाची आवश्यकता ! – सुरेश भोळे, आमदार, भाजप

सनातन संस्थेच्या वतीने चालू असलेल्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानां’तर्गत १६ ऑक्टोबर या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी आमदार श्री. सुरेश दामू भोळे यांची सदिच्छा भेट घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

खरा ‘मानवताधर्म’ स्थापन करण्याची संजीवनी बुटी म्हणजे सनातनची ग्रंथसंपदा ! – पू. सचिनदेव महाराज, अमरावती

अभियानाच्या निमित्ताने संत श्री अच्युत महाराज यांचे उत्तराधिकारी पू. सचिनदेव महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे आणि श्री. कपिल देव यांनी ६ ऑक्टोबर या दिवशी त्यांची भेट घेतली.

सनातन संस्था उत्तम रितीने धर्मकार्य करत आहे ! – श्री श्री स्वयंप्रकाश सच्चिदानंद सरस्वती महास्वामीजी

सनातनच्या चैतन्यदायी ग्रंथांचा लाभ समाजातील अधिकाधिक लोकांना व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने भारतभर ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे.

सनातन करत असलेले कार्य उत्तम ! – श्रीकृष्णनंद गुरुजी, दत्तसेवाश्रम, दावणगेरे, कर्नाटक

मी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचा वर्गणीदार असून नियतकालिकातही पुष्कळ चांगले विषय असतात. हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोचायला हवे. तुम्ही करत असलेले कार्य उत्तम आहे. तुम्ही हे कार्य पुढे चालवा, असा आशीर्वाद दावणगेरे येथील दत्त सेवाश्रमाचे श्रीकृष्णनंद गुरुजी यांनी सनातनच्या साधकांना दिला.

सनातन संस्था पुष्कळ आधीपासून धर्माविषयी जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे ! – श्री गंगाधरेंद्र सरस्वती स्वामीजी, शिरसी, कर्नाटक

सनातन संस्था पुष्कळ आधीपासून धर्माविषयी जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आता या ग्रंथ अभियानाच्या माध्यमातून ज्ञानशक्तीचा प्रसार करणे, ही अतिशय स्तुत्य गोष्ट आहे.

हिंदूंना धर्मज्ञान देण्याचे सनातन संस्थेचे कार्य स्तुत्य ! – श्री श्री विदुशेखर भारती महास्वामीजी, उत्तराधिकारी, श्रृंगेरी श्री शारदा पीठ

आम्ही अनेक वर्षांपासून सनातनच्या संपर्कात आहोत. सनातनचे कार्य पुष्कळ चांगले चालू आहे, असे गौरवोद्गार दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कन्याडी येथील श्री श्री श्री सद्गुरु ब्रह्मानंद सरस्वती महाराज यांनी सनातन संस्थेच्या कार्याविषयी काढले.

सनातनचे सर्व ग्रंथ उत्तम असून राज्यातील सर्व मंदिरांमध्ये ठेवणे आवश्यक ! – महर्षि डॉ. आनंद गुरुजी, अध्यक्ष, कर्नाटक राज्य धार्मिक परिषद

३ सप्टेंबर या दिवशी सनातनच्या साधकांनी ‘सनातन ज्ञानशक्ती प्रसार मोहिमे’साठी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्या वेळी त्यांनी हे गौरवोद्गार काढले.

सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने म्हणजे समाजाची सात्त्विकता वाढवणारे चैतन्याचे स्रोत ! – वैद्या (सौ.) प्रियाताई शिंदे

वैद्या (सौ.) प्रियाताई शिंदे यांनी सातारा येथील धर्माभिमानी हिंदु तथा समाजसेवक विजय कृष्णा गाढवे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. तेव्हा त्या बोलत होत्या.