सनातन संस्था पुष्कळ आधीपासून धर्माविषयी जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे ! – श्री गंगाधरेंद्र सरस्वती स्वामीजी, शिरसी, कर्नाटक

सनातन संस्थेचा ग्रंथ दाखवतांना श्री गंगाधरेंद्र सरस्वती स्वामीजी

शिरसी (कर्नाटक) – सनातन संस्था पुष्कळ आधीपासून धर्माविषयी जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आता या ग्रंथ अभियानाच्या माध्यमातून ज्ञानशक्तीचा प्रसार करणे, ही अतिशय स्तुत्य गोष्ट आहे. त्याला आमचे निश्चितच सहकार्य असेल, असे आशीर्वाद श्री सोंदा स्वर्णवल्ली येथील मठाचे श्री गंगाधरेंद्र सरस्वती स्वामीजी यांनी सनातन संस्थेच्या साधकांना दिले. सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन धर्म ज्ञानशक्ती अभियान’ राबवण्यात येत आहे. सनातनचे विविध विषयांवरील ग्रंथ समाजापर्यंत पोचवण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. याविषयी स्वामीजींना माहिती देण्यात आली. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. भावना नेत्रेकर, सौ. सुमंगला नायक आणि श्री. शरतकुमार हे उपस्थित होते.