हिंदूंचे संघटन आणि हिंदु राष्ट्र यांसाठी अहोरात्र झटणारी एकमेव संस्था, म्हणजे सनातन संस्था होय ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे सनातन संस्थेप्रती गौरवोद्गार !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी (डावीकडे) यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक आणि ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना श्री. गुरुबसु हत्ती

जत (जिल्हा सांगली), ११ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदूंचे संघटन आणि हिंदु राष्ट्र यांसाठी अहोरात्र झटणारी एकमेव संस्था, म्हणजे सनातन संस्था होय ! मी प्रतिदिन ‘दैनिक सनातन प्रभात’ वाचतो. हे दैनिक प्रत्येक गावात, तसेच प्रत्येक घरात चालू होणे आवश्यक आहे, असे गौरवोद्गार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी काढले. ते जत येथे धारकर्‍यांच्या बैठकीसाठी आले असता सनातनच्या साधकांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी हे गौरवोद्गार काढले. या वेळी श्री. गुरुबसु हत्ती यांनी पू. भिडेगुरुजी यांना ‘दैनिक सनातन प्रभात’चा अंक आणि ‘सनातन पंचांग २०२२’ भेट दिले. या प्रसंगी सनातनच्या साधिका सौ. निला हत्ती आणि सौ. विनया चव्हाण उपस्थित होत्या.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी (डावीकडे) यांच्याशी चर्चा करतांना श्री. गुरुबसु हत्ती, सौ. निला हत्ती (मध्यभागी हात जोडलेल्या) आणि सौ. विनया चव्हाण (मागील बाजूस)

विशेष

१. या वेळी पू. भिडेगुरुजी यांनी सनातनच्या साधकांची आपुलकीने चौकशी केली.

२. या वेळी धारकर्‍यांनी ‘सनातन पंचांग २०२२’ विकत घेतले.

३. सौ. विनया चव्हाण यांनी धारकर्‍यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने होणार्‍या ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाविषयी माहिती दिल्यावर धारकर्‍यांनी ‘याची ‘पोस्ट’ (कार्यक्रमाची माहिती) त्यांनाही नियमित पाठवा’, अशी मागणी केली.