सनातन संस्थेची ग्रंथसंपदा समाजापर्यंत पोचणे ही काळाची आवश्यकता ! – सुरेश भोळे, आमदार, भाजप

आमदार श्री. भोळे (मध्यभागी) यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव आणि शेजारी श्री. दत्तात्रेय वाघुळदे

जळगाव, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – सनातन संस्थेची ग्रंथसंपदा समाजासाठी आवश्यक असून ती समाजापर्यंत पोचणे ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार श्री. सुरेश दामू भोळे उपाख्य राजू मामा यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने चालू असलेल्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानां’तर्गत १६ ऑक्टोबर या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी आमदार श्री. सुरेश दामू भोळे यांची सदिच्छा भेट घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. श्री. भोळे यांनी आमदार निधीतून १ लाख रुपयांचे सनातनचे ग्रंथ स्थानिक मतदारसंघातील वाचनालयांना देण्याचे, तसेच वैयक्तिक स्तरावर काही ग्रंथ खरेदी करणार असल्याचे आश्वासन दिले. ञश्री. भोळे यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट म्हणून देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रेयस पिसोळकर उपस्थित होते.