खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी अमरावती येथे परिवहन अधिकार्यांना निवेदन !
सण, उत्सव आणि शालेय सुट्या यांच्या कालावधीत खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकिटाचे अधिक दर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते.
सण, उत्सव आणि शालेय सुट्या यांच्या कालावधीत खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकिटाचे अधिक दर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते.
सण, उत्सव आणि शालेय सुटी या कालावधीत खासगी ट्रॅव्हल्समालकांकडून तिकिटांचे अधिक दर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. याला प्रतिबंध घालण्यासंदर्भात परिवहन विभागाने राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांना आदेश दिले आहेत.
यासंबंधी कायदा करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी दिली.
पी.एम्.पी.ला (‘पुणे महानगर परिवहन’ला) प्रतिदिन १ कोटी ५० लाख रुपये उत्पन्न मिळते. त्यातील ९० लाख रुपये हे ठेकेदारांच्या बसमधून मिळतात; पण ठेकेदारांच्या ८५० बसगाड्यांसाठी पी.एम्.पी.लाच १ कोटी ५० लाख रुपये भाडे द्यावे लागते.
ज्याप्रमाणे रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली, तशी कारवाई राज्यातील अन्यत्रच्या विभागांनीही करावी !
सोलापूर परिवहन विभाग तोट्यात असल्याने यापूर्वी महापालिका सभागृहाने खासगीकरण करण्याचा ठराव केला होतो. त्यानुसार त्यातील २७ मार्गांवर खासगी आस्थापनेकडून चालवण्यासाठी महापालिकडून दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती; मात्र ही निविदा कुणीच भरलेली नाही.
गणेशोत्सवाच्या कालावधीत भरमसाठ तिकीटदर आकारून खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून भाविकांची आर्थिक लूट चालू आहे. ‘या विरोधात तक्रार आली, तरच कारवाई करू’, अशी भूमिका घेणार्या मोटार वाहन विभागाने संकेतस्थळावर तक्रार करण्यासाठीची सुविधा बंद ठेवली आहे.
उत्सवाच्या काळात खासगी बसगाड्यांनी प्रवाशांकडून भरमसाठ तिकीट आकारणे, ही जनतेची लूट आहे. अशा प्रकारची लूट वर्षांनुवर्षे चालू असतांना प्रशासन झोपले आहे का कि ही लूट त्याला मान्य आहे ?
आजकाल बाजारात आधुनिक प्रकारचे चाके असलेले लाकडी किंवा लोखंडी जिने मिळतात. शासनाने अशा प्रकारचे दोन किंवा तीन पायर्यांचे चाके असलेले जिने उपलब्ध करण्याचा विचार गांभीर्याने करणे आवश्यक आहे.
येथील जुन्या ‘आर्.टी.ओ.’ अधिकार्याच्या स्वाक्षर्या करून एका ‘जेसीबी’ यंत्राची बनावट कागदपत्रे सिद्ध केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांच्या तक्रारीवरून वरिष्ठ लिपिक सुरेखा डेडवाल आणि दलाल सय्यद शाकेर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा ..