
पुणे – येथील पिंपरी-चिंचवड शहरात घरगुती गॅसची चोरी करणार्या टोळीला सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी कारवाईमध्ये एकूण ३८१ गॅसच्या रिकाम्या आणि भरलेल्या टाक्या जप्त करण्यात आल्या असून एकूण २२ जणांना कह्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई २० फेब्रुवारी या दिवशी सांगवी परिसरात करण्यात आली आहे. संबंधित आरोपी हे भैरवनाथ गॅस एजन्सी आणि कांकरिया गॅस एजन्सीमधील कर्मचारी असल्याचे समोर आले असून २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुख्य गोडाऊनमधून इतर दुसर्या गोडाऊनमध्ये गॅस सिलेंडर नेऊन तिथे कनेक्टरच्या साहाय्याने एका सिलिंडरमधून १ ते २ किलो गॅस दुसर्या रिकाम्या सिलेंडरमध्ये भरायचे. पुन्हा ते गॅस ग्राहकांना विकायचे, असा अपप्रकार चालू होता.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर