बुलढाणा येथे ‘कोविड केंद्रा’ची दुरवस्था : इंजेक्शन, बाटल्या उघड्यावर !

प्रशासनाचे दुर्लक्ष

‘कोविड केंद्रा’त स्वच्छता नसेल, तर तेथे कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होऊ शकतो, याची जाणीव प्रशासनाला असतांनाही त्याची दुरवस्था कशी होते ? अशी दुरवस्था करणारे आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर वरिष्ठ अधिकार्‍यांनी कठोर कारवाई केली पाहिजे !

बुलढाणा – कोरोना रुणांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. शहरात ज्या ठिकाणी ‘कोरोना पॉझिटिव्ह’ रुग्णांवर उपचार चालू आहेत, त्या ‘कोविड केंद्रा’ची दुरवस्था झाली आहे. या केंद्रात प्रचंड अस्वच्छता झाली असून वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात येत आहे. यामध्ये बाटल्या, इंजेक्शन्स, सलाईन यांचा समावेश आहे. या प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील अपंग निवासी शाळेत ‘कोविड केंद्र’ असून या ठिकाणी प्रतिदिन शेकडो कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. केंद्रात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ‘कोविड केंद्रा’ची परिस्थिती अतिशय विदारक झाली असल्याची व्यथा येथील कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांनी मांडली. २२ फेब्रुवारी या दिवशी ‘आठवडी बाजार’ बंद होता. बाजारातील सर्व दुकाने, भाजी मंडई, पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती.