अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम जयंती साजरी
संपूर्ण महाराष्ट्रासह हे जग कोरोनामुक्त व्हावे, यासाठी महामृत्यूंजय जपाची सामूहिक आवर्तने करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रासह हे जग कोरोनामुक्त व्हावे, यासाठी महामृत्यूंजय जपाची सामूहिक आवर्तने करण्यात आली.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचे अवलोकन केल्यावर ही कडक दळणवळण बंदी २६ मेअखेर वाढवण्यात आली आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर आणि आयुक्त यांच्या निर्देशानुसार कोरोनाची तिसरी लाट आणि लहान मुलांची कोरोना संसर्गापासून दक्षता घेण्यासंदर्भात आराखडा सिद्ध करण्यात येत आहे.
अधिवक्त्याकडून १ कोटी ७० लाख रुपयांची लाच स्वीकारण्याच्या प्रकरणात बाळासाहेब वानखेडे यांना अटक करण्यात आली होती. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा ८८ लाख ८५ सहस्र रुपयांची मालमत्ता अधिक असल्याचे आढळून आले.
शहरातील किराणा, भाजी, फळे, मांस विक्रीची दुकाने १५ मेपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत चालू असणार आहेत, असे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले.
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नातेवाइकांचा वावर वाढल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. ही गोष्ट लक्षात आल्याने ‘रुग्णांच्या नातेवाइकांना पीपीई किटविना रुग्णालयाच्या आत सोडू नये’, असा आदेश जिल्हाधिकार्यांनी दिला आहे.
मागील २० वर्षांपासून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात सक्रीय असलेल्या ‘गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा’ संस्थेच्या वतीने अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने शेवगाव शहर आणि परिसरातील ६० गरजू आणि गरीब कुटुंबांना ५० सहस्र रुपये मूल्याच्या किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून ७ नव्या रुग्णवाहिका दाखल झाल्या असून याचा लाभ जिल्हा उपरुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्र यांना होणार आहे.
सनातनचे साधक श्री. सुधीर बोर्डे यांचे ज्येष्ठ बंधू सुनील त्रिंबकराव बोर्डे (वय ६० वर्षे) यांचे दिर्घ आजाराने १५ मे या दिवशी नाशिक येथे निधन झाले.
सौ. सुजाता भंडारी यांनी कुलदेवीच्या नामजपाचे महत्त्व, दत्ताच्या नामजपाचे महत्त्व आणि लाभ अशा प्रकारे अध्यात्मशास्त्रविषयक माहितीचा व्हिडिओ सिद्ध केला. हा व्हिडिओ यूट्यूब वर अपलोड करून याची लिंक वरील गटामध्ये पाठवली. हा व्हिडिओ ३४६ पेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे