‘ऑनलाईन’ नोंदणी पद्धतीमुळे शिराळा तालुक्यात स्थानिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा !
‘ऑनलाईन’ नोंदणीमुळे तालुक्यातील फक्त १३ नागरिकांना आणि तालुक्याबाहेरील ३३४ व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस मिळाली आहे.
‘ऑनलाईन’ नोंदणीमुळे तालुक्यातील फक्त १३ नागरिकांना आणि तालुक्याबाहेरील ३३४ व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस मिळाली आहे.
हातखर्चातून साठवलेल्या पैशातून कोरोनाग्रस्तांना विनामूल्य न्याहरी पुरवणार्या ५ महाविद्यालयीन युवतींचे अभिनंदन ! अशा सात्त्विक व्यक्तीच देशाची शक्ती आहेत. यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा.
संकेश्वर येथील सनातनच्या साधिका सौ. सुजाता अशोक मोकाशी (वय ४७ वर्षे) यांचे १४ मे या दिवशी कोरोनाबाधित असल्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, २ मुली असा परिवार आहे. सनातन परिवार मोकाशी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
सनातनच्या साधिका सौ. श्रद्धा कापशिकर यांचे वडील रघुनाथ दिगंबर कुलकर्णी (वय ७६ वर्षे) यांचे पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे १३ मे या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
महाराष्ट्रातील नामवंत असलेल्या शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या वतीने दळणवळण बंदीच्या सर्व नियमांचे पालन करत ‘घराघरात मनामनात शंभुराजे’ या उपक्रमाने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
सौम्य लक्षणांचे कोरोना रुग्ण ‘होम आयसोलेशन’ (गृह विलगीकरण) कालावधीत बाहेर फिरतात. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या रुग्णांना ‘संस्थात्मक विलगीकरणा’त ठेवावे, अशी सूचना ‘टास्क फोर्स’ने केली आहेे.
जिल्ह्यातील खामगाव येथील पोलिसांनी पुन्हा एकदा राबवलेल्या ‘कोम्बिंग ऑपरेशन’मुळे २ अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात आलेे.
म्हसवड (जिल्हा सातारा) – येथील सनातनच्या साधिका सौ. दुर्गा टकले यांच्या सासूबाई सौ. रुक्मिणी मधुकर टकले (वय ७५ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, त्या ठिकाणी ‘सी.सी.टी.व्ही.’ बसवावेत, अशा मागण्यांचे निवेदन शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. मयुर घोडके आणि सरचिटणीस श्री. राहुल यमगर यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
लस घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवणे हे पुष्कळ महत्त्वाचे आहे; पण रक्तदान करून दुसर्याला सुरक्षित करणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.