पोलीस खाते आणि प्रशासन यांची दुःस्थिती !

‘सध्याचे पोलीस खाते आणि प्रशासन यांची दुःस्थिती पहाता पुढील काळात ‘भ्रष्टाचार न करणारा १ तरी पोलीस आणि सरकारी अधिकारी दाखवा आणि इनाम मिळवा !’, अशी जाहिरात आल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिदूंना भारतातही कुणी विचारत नाही !

‘धर्मांध स्वधर्माच्या शिकवणीचे पालन करतात; म्हणून जगाला डोईजड झाले आहेत. याउलट हिंदूंमधील तथाकथित पुरोगामी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि विद्रोही हिंदूंमध्ये धर्माविषयी विकल्प निर्माण करून, फूट पाडून हिंदूंना दुबळे करतात. त्यामुळे हिंदूंना भारतातही कुणी विचारत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

निवडणुकांचा पोरखेळ !

‘निवडणुकीसंदर्भात प्रतिदिन येणार्‍या बातम्या वाचून वाटते, ‘आता निवडणुका हा पोरखेळ झाला आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्वामी विवेकानंद यांचे वेगळेपण !

‘कुठे बंगालमधील साम्यवादी आणि मुसलमानांचे लांगूलचालन करणारे हल्लीचे हिंदू, तर कुठे बंगालमधीलच रामकृष्ण परमहंस यांचे हिंदु धर्माला जगात सर्वोच्च स्थान मिळवून देणारे शिष्य स्वामी विवेकानंद !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

‘वर्तमान परिस्थिती स्वीकारून तिला सामोरे जाणे’, हीच ईश्वरेच्छा असणे

भारताचे वेगळेपण !

‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांची पात्रता !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील ‘देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने ‘वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

शिक्षणात माणुसकी न शिकवल्याचा परिणाम !

‘शाळेपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कोणत्याही शिक्षणात माणुसकी न शिकवल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात जनतेला लुबाडणारे व्यावसायिक आणि नोकरी करणारे निर्माण झाले आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जागृत हिंदूंना दिशा देणे आवश्यक !

‘कृतीशील हिंदूंनो, झोपलेल्या हिंदूंना जागृत करण्यात वेळ न घालवता आता जागृत हिंदूंना दिशा देण्याचे कार्य करा, तरच तुम्ही जवळ आलेल्या आपत्काळात वाचाल आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकाल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आगामी ‘हिंदु राष्ट्रा’त सरकारी नोकरीसाठीचा निकष !

‘पोलीस आणि सैन्य यांचीच नव्हे, तर प्रशासनातील सर्वांचीच भरती करतांना हिंदु राष्ट्रात ‘राष्ट्र अन् धर्म यांवरील प्रेम’ हा सर्वांत मोठा घटक समजण्यात येईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले