राष्ट्रप्रेमी हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात आपण श्रीरामाच्या वानरसेनेतील वानरांप्रमाणे सहभागी आहोत’, हा भाव ठेवा !

असा भाव ठेवला, तर रामराज्याची, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होण्याबरोबर आपलाही उद्धार होईल, नाहीतर हिंदु राष्ट्राची स्थापना झाली, तरी अहंभाव जागृत असल्यावर आपला उद्धार होणार नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लवकरच होणार हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘कलियुगांतर्गत कलियुग म्हातारे झाले आहे. आता ते नष्ट होऊन कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साम्यवाद स्वीकारल्यामुळे बंगाल आणि केरळ येथील हिंदूंची स्थिती केविलवाणी होणे

‘बंगाल आणि केरळ येथील हिंदूंनी ३० वर्षांहून अधिक काळ साम्यवाद स्वीकारला; म्हणून ते हिंदुत्वापासून दूर गेले. त्यामुळे त्यांच्यात धर्माभिमान उरला नाही. म्हणूनच ते सद्य:स्थितीत मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या आक्रमणांना तोंड देऊ शकत नाहीत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पाश्‍चात्त्य आणि हिंदु संस्कृती यांतील भेद !

‘पाश्‍चात्त्य संस्कृती स्वेच्छेला प्रोत्साहन देणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करते आणि दुःखाला निमंत्रण देते, तर हिंदु संस्कृती ‘स्वेच्छा नष्ट करून सत्-चित्-आनंदावस्था कशी प्राप्त करायची’, हे शिकवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंना धर्म शिकवला, तरच त्यांची मते इतर धर्मियांप्रमाणे एकगठ्ठा होतील !

‘मुसलमान आणि ख्रिस्ती त्यांचे हित पहाणार्‍यांनाच मते देतात, तर हिंदू बुद्धीप्रामाण्यवाद, समाजवाद, साम्यवाद इत्यादी निरनिराळ्या विचारसरणींप्रमाणे मते देतात. त्यामुळे त्यांची मते फुटतात. त्यामुळे त्यांना भारतात किंमत उरली नाही ! हिंदूंना धर्म शिकवला, तरच त्यांची मते इतर धर्मियांप्रमाणे एकगठ्ठा होतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !

‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या धार्मिक उत्सवाला गर्दी जमवण्यासाठी नाटक, चित्रपट, वाद्यवृंद असे कार्यक्रम ठेवावे लागत नाहीत. याउलट हिंदूंच्या धार्मिक उत्सवाच्या वेळी मात्र असे कार्यक्रम ठेवावे लागतात. यावरून ‘हिंदू केवळ करमणुकीसाठी धार्मिक उत्सव साजरे करतात का ?’, असा प्रश्‍न पडतो.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

असे हिंदू हिंदु धर्मात नकोत !

‘हिंदू धर्मांतर करतात, ते ईश्‍वरप्राप्तीसाठी नाही, तर आर्थिक सुख-सोयींसाठी. असे लोक हिंदु धर्मात नाहीत, हेच बरे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्माचे महत्त्व !

‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने संशोधन करावे लागत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्माचे महत्त्व !

‘जगातील इतर सर्व विषयांचे ज्ञान अहंकार वाढवते, तर अध्यात्म हा एकच विषय असा आहे की, जो अहंकार अल्प करण्यास साहाय्य करतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाचा अहंकार असलेल्यांनो, अध्यात्माच्या तुलनेत विज्ञान किती थिटे आहे, हे समजून घ्या !

‘पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल इत्यादी सर्व विषय केवळ त्या त्या विषयातील माहिती सांगू शकतात. याउलट अध्यात्म हा विषय जगातील सर्व विषयांची माहिती सांगू शकतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले