पुणे येथे २ पोलिसांच्या अंगावर रिक्शा घालून त्यांना घायाळ करत चोराचे पलायन !

गुन्हेगारांना कायद्याचा धाकच राहिला नसल्याने गुन्हेगारांचा उद्दामपणा वाढत चालला आहे. स्वतःच्या रक्षणासाठी सतर्कता नसणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

३० सहस्र रुपयांची लाच घेतांना पुणे येथील तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

मृत्यूपत्र आणि हक्कसोडपत्र यांची सातबार्‍यात नोंद करून घेण्यासाठी ३० सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या चर्‍होली येथील मारुति पवार या तलाठ्यास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २७ सप्टेंबर या दिवशी कह्यात घेतले.

‘मराठे ज्वेलर्स’कडून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

कॉसमॉस बँकेकडून घेतलेल्या ६० कोटी रुपयांच्या कर्जाचीही परतफेड नाही !

वाहतूक व्यावसायिक आणि उद्योजक यांच्याकडे खंडणी मागणार्‍यांच्या मुसक्या आवळणार ! – पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे आवाहन

माथाडी कामगार किंवा इतर संघटनांची भीती दाखवून वाहतूक व्यावसायिक आणि उद्योजक यांच्याकडे पैसे मागणार्‍यांच्या मुसक्या आवळण्यात येतील. कोणत्याही उद्योजक आणि व्यावसायिक यांनी घाबरून न जाता असा प्रकार घडल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल…

पर्यटनबंदी असतांना वरिष्ठ अधिकार्‍यांची ओळख सांगणार्‍या नातेवाइकांना वनअधिकार्‍यांनी सिंहगड किल्ल्यावर सोडले !

१६ जुलै २०२१ या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सिंहगड किल्ल्यासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या बंदीचा आदेश लागू केला आहे; मात्र असे असतांनाही वरिष्ठ अधिकार्‍यांची ओळख असल्याचे सांगून अधिकार्‍यांचे नातेवाईक गडावर फिरून येतात…

आय.पी.एल्. सट्ट्यावर पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक बुकींना (सट्टेबाज) अटक !

पुणे शहर पोलिसांनी २६ सप्टेंबरच्या रात्री आय.पी.एल्.वर सट्टा खेळणार्‍या २ ठिकाणी एकाच वेळी मोठी कारवाई करत सट्टाकिंग गणेश भुतडा आणि अशोक जैन या २ आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट बुकींसह अनेकांना कह्यात घेतले आहे.

एन्.डी.ए. (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) मध्ये विद्यार्थ्याचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू !

प्रशिक्षणादरम्यान मूळचा मालदीव येथील कॅडेट मोहम्मद इब्राहिम या परदेशी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याविषयी उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात् मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत करापोटी ‘राष्ट्रीय लोक अदालती’तून १५ कोटी रुपयांची वसुली !

याचा लाभ जिल्ह्यातील १ सहस्त्र ३९९ ग्रामपंचायतींना झाला.

नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका ! – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कंत्राटदारांना चेतावणी

येथील सिंहगड रस्त्याच्या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती नुकतेच झाले.

मानद पशू कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी दिलेल्या बातमीच्या आधारे अवैधरित्या गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणार्‍या दोघांवर पुणे येथे गुन्हा नोंद !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही प्रतिदिन गोहत्या होत आहेत, हे चिंताजनक आहे.