वाहतूक व्यावसायिक आणि उद्योजक यांच्याकडे खंडणी मागणार्‍यांच्या मुसक्या आवळणार ! – पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे आवाहन

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख

किरकटवाडी (पुणे) – माथाडी कामगार किंवा इतर संघटनांची भीती दाखवून वाहतूक व्यावसायिक आणि उद्योजक यांच्याकडे पैसे मागणार्‍यांच्या मुसक्या आवळण्यात येतील. कोणत्याही उद्योजक आणि व्यावसायिक यांनी घाबरून न जाता असा प्रकार घडल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथील सिंहगड इंडस्ट्रियल असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यावसायिक आणि उद्योजक यांमध्ये पसरलेली भीती घालवण्यासाठी देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सुरक्षा शाखा पोलीस निरीक्षक, सिंहगड इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांसह परिसरातील उद्योजक आणि व्यावसायिक उपस्थित होते.