दिवाळीत प्रदूषण दिसणार्‍या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांना लोकांनी म्हटले ‘ढोंगी’ !

चित्रपट कलाकारांसाठी फटाक्यांमुळे केवळ दिवाळीत प्रदूषण होते. नवीन वर्षात फटाक्यांमधून प्राणवायू (ऑक्सिजन) सोडला जातो !

Mumbai Fog Spreads To Sea : अरबी समुद्रात असणार्‍या दाट धुक्यामुळे मुंबई समुद्र किनार्‍यापासून २०० किमी लांब समुद्रात पळाले मासे !

अरबी समुद्रात असणार्‍या दाट धुक्यामुळे मासे १८० ते २०० किमी लांब समुद्रात गेले आहेत. त्यामुळे येथील समुद्र किनारपट्टीवर मासेमारी करणार्‍यांना मासेमारीसाठी २०० किमी दूर समुद्रात जावे लागत आहे. त्यामुळे मासेमारी करणार्‍यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Polluted Mumbai : मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ‘खराब’ !

देशाच्या आर्थिक राजधानीत हवेचे प्रदूषण रोखता न येणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद !

Mass Fish Death In Pune River : मुळा-मुठा नदीमध्ये रसायनमिश्रीत दूषित पाणी आल्याने सहस्रो माशांचा मृत्यू !

गणेशोत्सवाच्या वेळी मूर्ती विसर्जनामुळे पाण्याचे प्रदूषण होते, असे म्हणणारे कथित पर्यावरणप्रेमी याविषयी काही बोलणार आहेत का ?

म्हादई आणि झुआरी नद्यांच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकाकडून ९५ कोटी २३ लाख रुपये संमत !

नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘नमामी गंगे’ या केंद्र सरकारच्या उपक्रमाखाली गोव्यातील मांडवी आणि झुआरी या दोन नद्यांची निवड करण्यात आली असून या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारने ९५ कोटी २३ लाख रुपये निधी संमत केला आहे

शेरीनाला मलशुद्धीकरण प्रकल्पास तातडीने प्रशासकीय मान्यता द्या !

कृष्णा नदीच्या पात्रात शेरीनाल्याचे पाणी मिसळून प्रदूषण होते, ते रोखण्यासाठी नवीन प्रस्तावित मलशुद्धीकरण प्रकल्पास तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

बदलापूर येथे ‘नायट्रोजन डायऑक्‍साईड’ची गळती !

शहरात रात्री रासायनिक वायू गळती झाली. महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या बदलापूर केंद्रात रात्री ९ च्‍या सुमारास ‘नायट्रोजन डायऑक्‍साईड’ची (NO2) नोंद झाली. त्‍याचा निर्देशांक ५६ वरून ३२५ पर्यंत पोचला.

लोणावळा नगर परिषदेकडून सांडपाणी थेट नद्यांत सोडल्‍याचा प्रकार उघडकीस !

‘श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते’, अशी ओरड करणारे तथाकथित पर्यावरणवादी याविषयी काही बोलणार का ?

केंद्रीय प्रदूषण मंडळाच्‍या अहवालानुसार सांगलीची हवा सर्वांत चांगली !

सांगली जिल्‍ह्यातील प्रदूषण राज्‍याच्‍या तुलनेत अगदी अल्‍प असून राज्‍यातील सर्वांत चांगली आरोग्‍यदायी हवा सांगलीची असल्‍याचा उल्लेख मंडळाने केला आहे.