मणीपूरच्या विधानसभा अधिवेशनावर ख्रिस्ती कुकी आमदारांचा बहिष्कार !

कुकींच्या मागण्या मान्य न केल्याने घेतला निर्णय !
‘कुकी पीपल्स अलायन्स’च्या २ आमदारांनी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दिलेले समर्थन मागे घेतले !

काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीच्‍या बैठकीचे यजमानपद उद्धव ठाकरे यांच्‍याकडे !

इंडिया’च्‍या बैठकीच्‍या आयोजनाच्‍या पार्श्‍वभूमीवर ६ ऑगस्‍ट या दिवशी नेहरू सेंटर येथे बैठक पार पडली. याविषयी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आमच्‍यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार महत्त्वाचे नेते आहेत.

शेतकर्‍यांच्या हितासाठी राज्यशासनाने विमा योजना लागू करावी ! – खासदार उदयनराजे भोसले

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकर्‍यांच्या हितासाठी विमा योजना लागू करावी, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे, तसेच शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय उपचार नागरिकांना विनामूल्य करण्याच्या मागणीस मान्यता दिल्याने ….

(म्हणे) ‘औरंगजेबाचे उदात्तीकरण केले तर त्यात वाईट काय ?’ – प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी

भारतभरातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे, हा राष्ट्रद्रोहच आहे. अशांना भारतात रहायला देणेच चुकीचे आहे.

सभागृह कि गोंधळगृह ?

सभागृह बंद पाडण्यासाठी विरोधी पक्ष काही ना काही कारणेच शोधत असतात. अधिवेशन चालू होण्यापूर्वीच ‘सरकारला कोणत्या सूत्रांवरून कोंडीत पकडायचे ?’, ते विरोधकांनी आधीच ठरवलेले असते आणि तसे ते सांगतातही. त्यामुळे अधिवेशन हे ‘सरकारला कोंडीत पकडण्यासाठी कि जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ?’, असा प्रश्न पडतो !

चित्रीकरणातील कृती प्रशिक्षणाचा भाग नाही ! – एन्.सी.सी.

या घटनेच्‍या तीव्र प्रतिक्रिया ४ ऑगस्‍टला ठाणे येथे उमटल्‍या. राष्‍ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसे या राजकीय पक्षांच्‍या कार्यकर्त्‍यांनी महाविद्यालयाबाहेर आंदोलन केले.

मिरजेत ५ ऑगस्‍टला शरद पोंक्षे राजकीय विश्‍लेषकांची मुलाखत घेणार !

याचे आयोजन ‘श्रीराम सेवा संस्‍थे’च्‍या वतीने करण्‍यात आले असून याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ करून घ्‍यावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

गोवा : लोकप्रतिनिधींच्या विरोधात साडेपाच वर्षांत १३५ गुन्हे नोंद

गेल्या साडेपाच वर्षांत आजी-माजी आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, पंचसदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात हे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. यामधील ५९ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, तर १६ प्रकरणांचे पोलीस अन्वेषण करत आहेत.

भारतासमवेतचे भक्कम संबंध श्रीलंकेच्या विकासासाठी महत्त्वाचे ! – श्रीलंका

भारतासमवेत भक्कम नाते निर्माण करतांना चीनला दूर ठेवणे आणि श्रीलंकेतील तमिळ हिंदूंचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. श्रीलंकेने त्याविषयी भारताला आश्‍वस्त करून कृती करावी !

श्रीलंकेने तमिळांच्या प्रश्‍नांवर बोलावली सर्वपक्षीय बैठक !

श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी देशातील अल्पसंख्य तमिळांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. त्यांनी सर्व पक्षांना या संदर्भातील चर्चेत सहभागी होऊन यावर एकमत निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.