वैयक्तिक आणि राजकीय कारणांमुळे दिले त्यागपत्र !
डब्लिन (आयर्लंड) – आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी पदाचे, तसेच त्यांच्या पक्षाच्या नेतेपदाचेही त्यागपत्र दिले आहे. ते म्हणाले की, माझे पद सोडण्याचे कारण वैयक्तिक आणि राजकीय दोन्ही आहे. मला वाटते की देशाच्या युती सरकारला आणखी एखाद्या नेत्याच्या नेतृत्वाखाली पुढे जाण्याची चांगली संधी असेल.
सौजन्य Sky News
४३ वर्षीय लिओ वराडकर हे आयर्लंडचे सर्वांत तरुण पंतप्रधान होते. ते दुसर्यांदा पंतप्रधान झाले होते. लिओ वराडकर यांचे वडील अशोक वराडकर वर्ष १९६० च्या दशकात ब्रिटननला गेले होते. ते मूळचे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराड गावचे होते. लिओ यांचा जन्म वर्ष १९७९ मध्ये डब्लिन येथे झाला. त्यांची आई आयर्लंडची आहे.