उत्तरप्रदेश येथे हिंदू असल्याचे सांगून मुसलमान तरुणाने हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले !

  • उत्तरप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा केल्यानंतरही धर्मांधांकडून अशा प्रकारच्या घटना करण्याचे थांबत नाही, हे लक्षात घेता अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
  • प्रेम करण्यासाठी धर्म का लपवावा लागतो ?, हे निधर्मीवादी सांगतील का ?

सिद्धार्थनगर (उत्तरप्रदेश) – येथे आलम अंसारी या मुसलमान तरुणाने ‘अनमोल मिश्रा’ असे नाव सांगून एका अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेल्याची घटना घडली आहे. पोलीस अंसारीचा शोध घेत आहेत. अंसारी याने ‘अनमोल मिश्रा’ या नावाने ‘इन्स्टाग्राम’वर खाते बनवले हेते. त्याच्या साहाय्याने त्याने या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्याने या खात्यावर ‘आय लव्ह इंडियन आर्मी (भारतीय सैन्यावर प्रेम करतो) असेही लिहिले होते. (हिंदु मुलींना फसवण्यासाठी अशा प्रकारची हुशारी करणारे धर्मांध ! ‘अशांवर देशद्रोहाचाही गुन्हा नोंदवायला हवा’, अशी मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक)