दत्त जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यावर भाविकांना निर्बंध, तर पर्यटकांना मात्र सवलत

नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या निमित्ताने गड-किल्ल्यांवर होणार्‍या ‘मद्य पार्ट्या’ यांवर अजून तरी कोणतेही निर्बंध घालण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. हा पोलिसांचा दुटप्पीपणा नव्हे का ?

लाच मागितल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यातील तलाठी आणि कोतवाल कह्यात

शेतभूमीच्या फेरफारमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच मागणारे तलाठी बेले आणि कळमनुरी तहसील कार्यालयातील कोतवाल शेख हमीद या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कह्यात घेतले.

गुन्हेगारीत बिहार राज्यातील पाटणानंतर महाराष्ट्रातील नागपूर दुसर्‍या क्रमांकावर !

नागपूरला ‘गुन्हेगारी शहर’(क्राईम सिटी) म्हणूनही संबोधले जात आहे.

मनसेचे पदाधिकारी लाच स्वीकारतांना पोलिसांच्या कह्यात !

तक्रार मागे घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे रिजनल ऑफिसच्या वतीने मनसे अधिकारी कैलास याने २० लाख रुपयांची मागणी केली.

अनधिकृत बंदूक बाळगणार्‍या तिघांना अटक

अनधिकृत बंदूक उपलब्ध करून देणार्‍यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी !

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवा ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार थांबवावेत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

३१ डिसेंबर या दिवशी पुण्यात पुन्हा एल्गार परिषद घेण्याचा डाव

वर्ष २०१७ मधील एल्गार परिषदेनंतर दुसर्‍या दिवशी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाजवळ हिंसाचाराची घटना घडली होती. या हिंसाचाराला एल्गार परिषदेचीच पार्श्‍वभूमी कारणीभूत असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले होते. गेल्या वेळेचा अनुभव पहाता पोलीस या परिषदेला अनुमती देणार का . . . ?

कोरोनाची नियमावली डावलून एल्गार परिषदेला अनुमती देता येईल का ? याचा विचार करता येईल ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

अनुमती देण्यापूर्वी या परिषदेतील चिथावणीखोर वक्तव्यांमुळे कोरेगाव भीमा दंगल झाली होती, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, असे जनतेला वाटते !

वसई (जिल्हा पालघर) येथे ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून रस्त्यावर फेकणार्‍या नराधमाला अटक

मुंबई उपनगरातील वसई येथे एका वासनांधाने ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून ती मृत झाली आहे, असे समजून पिशवीत भरून रस्त्यावर फेकून दिले. पोलिसांनी या नराधमाला अटक केले असून त्याने गुन्ह्याची स्वीकृती दिली आहे.

लहान मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधावर कठोर कारवाई करा ! – बजरंग दल आणि विश्‍व हिंदु परिषद यांची हातकणंगले पोलीस ठाण्यात मागणी

सहारानगर, रुई येथील लहान मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधावर कठोर कारवाई करा, अशी मागणी बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक भवड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.