कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर) – एका गुन्ह्याच्या घटनेत संशयित आरोपींना पकडण्यासाठी बारलोणी (तालुका माढा) येथे गेलेल्या सोलापूर ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकावर ८ जानेवारी या दिवशी अज्ञातांनी दगडफेक केली. त्यामध्ये गुन्हे शाखेचे काही पोलीस अधिकारी घायाळ झाले आहेत. (पोलिसांचा धाक अल्प झाल्यामुळे गुन्हेगार पोलिसांना जुमानत नाहीत. ही स्थिती पालटण्यासाठी गुन्हेगारांना पोलिसांचा धाक असणे आवश्यक आहे. – संपादक)
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे, कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे, उपनिरीक्षक चिमनाजी केंद्रे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी आले.