दिंडोरी (नाशिक) येथे लाखो रुपयांचा अवैध ‘सॅनिटायझर’चा साठा जप्त

तालुक्यातील जवळके दिंडोरी शिवारातील एका ‘वेअर हाऊस’मधील आस्थापनात अवैध आणि अप्रमाणित ‘सॅनिटायझर’चा अनुमाने ८ लाख रुपयांचा साठा दिंडोरी पोलिसांनी जप्त केला असून अमित अलिम चंदानी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नागोठणे (जिल्हा रायगड) येथे हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनानंतर नमाजपठण घरी करण्याचे मशिदीतून आवाहन

येथील प्रार्थनास्थळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाजपठण होत असल्याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती मंच यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर मशिदीतून घरीच नमाजपठण करण्याचे आवाहन केले गेले.

‘ती’ सूची पुढे पाठवल्यास गुन्हा नोंद होणार ! – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

कोरोनाबाधित असा अपप्रचार करून परदेशातून आलेल्या कोल्हापुरातील काही व्यक्तींची सूची सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे पुढे पाठवल्यास गुन्हा नोंद केला जाईल, अशी चेतावणी डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे. जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही.

कारवाईसाठी पोलिसांना संपूर्ण स्वातंत्र्य ; जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत ठेवणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य आणि जिल्हा प्रवेशबंदी अन् संचारबंदी यांसारख्या निर्णयांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल.

संचारबंदी असतांनाही रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍यांना पोलिसांकडून चोप

कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी राज्यातील शहरी भागांत कलम १४४ लागू होते. २२ आणि २३ मार्चला मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याने शेवटी राज्यशासनाने ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा कठोर निर्णय घेतला….