पुणे- कोरोना काळात केलेल्या कामामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे; मात्र चोरांना घाबरून रात्री गस्तीवर असलेले २ पोलीस पळून गेले असल्याची घटना सीसीटीव्हीमधून उजेडात आली. चोर आले म्हणून पोलीसच पळतात, ही केविलवाणी गोष्ट आहे. पोलिसांना बघून चोरांनी पळाले पाहिजे. त्या दोघांवर कारवाई केली; परंतु अशा घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा समाजात खराब होते. घडलेली घटना दुर्दैवी आहे. (पोलीस चोरांना घाबरतात म्हणजे त्यांना प्रशिक्षण योग्य प्रकारे दिले जात नाही का ? कि पोलिसांचे मनोधैर्य खालावले आहे ? – संपादक) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. पुण्यात औंधमधील शैलेश टॉवर सोसायटीमध्ये २८ डिसेंबरच्या रात्री ३ च्या सुमारास सोसायटीमधील चोरांना पाहून गस्तीवर असणार्या पोलिसांनी पळ काढला होता.