
कोल्हापूर, १२ एप्रिल (वार्ता.) – सर्व संसार यांचा त्याग करून धर्माची दीक्षा घेणार्या साधू, संत, साध्वी यांच्याकडे आधार कार्ड अथवा अन्य कायदेशीर रहिवासी पुरावा असत नाही. त्यामुळे ही अडचण लक्षात घेऊन जैन धर्मियांसह सर्व साधू-संतांना तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशा मागणी निवेदनाद्वारे गुजराती समाज महासंघाने आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावरकर यांच्याकडे केली आहे. या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेंद्र शहा, सर्वश्री तेजपाल शहा, अरविंद मणियार, प्रकाश शाह, युवराज शहा, स्वप्नील शहा, रोपन शहा यांसह अन्य उपस्थित होते. या संदर्भात एक-दोन दिवसांत निर्णय घेऊ, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !