रात्रीच्या वेळीही अंत्यसंस्कार !
कर्णावती (गुजरात) – देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या १० दिवसांपासून प्रतिदिन १ लाखाहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. अशामुळे अनेक ठिकाणी आरोग्यव्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे. रुग्णालयात खाटा उपलब्ध नाहीत आणि स्मशानात अंत्यसंस्कारासाठी जागा शिल्लक नाही, असे दृश्य दिसत आहे. गुजरातच्या कर्णावती, सूरत यांसारख्या प्रमुख शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृतांचा आकडा वाढतच असल्याने अनेक ठिकाणी रात्रीही अंत्यस्कार चालू आहेत. सूरत शहरातल्या उमरा भागात एका स्मशानात २ दिवसांपूर्वी एकाच वेळी २५ जणांना अग्नि देण्यात आला. रात्रीच्या सुमारास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बडोद्यातही रात्रीच्या वेळी मृतदेहांवर अंत्यविधी होत आहेत.