आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका !

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला पुन्हा फटकारले !

कर्नाटकला प्रतिदिन १ सहस्र २०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची याचिका फेटाळली

भारताने लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांचा सल्ला भारतात ‘फिल्ड रुग्णालये’ उभारली पाहिजेत

वणी (यवतमाळ) येथे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू यांचे प्रमाण सर्वाधिक !

तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. केवळ ३०९ लोकसंख्येच्या टाकळी गावात ७१ रुग्ण आढळून आले.

अमरावतीकडे लक्ष न दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आंदोलन करू ! – आमदार रवी राणा यांची चेतावणी

अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांना ऑक्सिजन अल्प पडत आहे. लसीकरणाची केंद्रे बंद आहेत. जिल्ह्यात प्रतिदिन १ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत, तर ३०-३५ रुग्ण मरण पावत आहेत; मात्र याकडे दुर्लक्ष केले होत आहे.

कोरोनाच्या काळात परदेशी आस्थापनांची औषधे लोकप्रिय करण्याचे प्रकार चालू आहेत ! – मुंबई उच्च न्यायालय

आर्थिक दुर्बल असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आयुष्यभर कमवलेली मिळकतही औषधोपचारासाठी व्यय करावी लागते. केंद्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून वैद्यकीय क्षेत्रात चालू असलेली ही लूटमार रोखून स्वदेशी औषधांविषयी जनजागृती करावी आणि त्यांंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष…

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसर्‍या लाटेचा विचार करा ! – पद्मश्री रमण गंगाखेडकर यांचे आवाहन 

आजमितीला कोरोनाची दुसरी लाटच अजून कायम आहे. प्रत्येक ठिकाणी ‘पीक’वर जाण्याचा आणि ओसरण्याचा कालावधी वेगवेगळा रहाणार आहे. दुसरी लाट ओसरणे तर दूरच राहिले, अजून ‘पीक’ वर आलेले नसतांना अकारण तिसर्‍या लाटेची चर्चा चालू करून भीती निर्माण करणे थांबवले पाहिजे…

नेपाळमध्ये कोरोनामुळे भारतापेक्षाही वाईट स्थिती निर्माण होण्याची भीती

नेपाळमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ‘कोरोनाच्या संसर्गावर वेळीच नियंत्रण न आणल्यास नेपाळमधील स्थिती भारतापेक्षाही अधिक वाईट होईल’, अशी चेतावणी तज्ञांनी दिली आहे. नेपाळ सरकारने साहाय्यासाठी इतर देशांना आवाहन केले आहे.

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे दोघा आधुनिक वैद्यांकडून अल्प मूल्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार !

सर्वत्र रुग्णांची लूट चालू असतांना अल्प मूल्यात उपचार देणारे असे आधुनिक वैद्य, हे वैद्यकीय खात्याचे भूषणच होय ! सर्वत्रच्या आधुनिक वैद्यांनी यांचा आदर्श घ्यावा !

वाढत्या कोरोनाबाधितांच्या सूचीत केंद्रशासनाकडून सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचे नाव समाविष्ट

गत २ आठवड्यांत देशातील कोरोनाबाधित रुग्ण वाढलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश केला आहे. याविषयीची माहिती केंद्र सरकारने नुकतीच घोषित केली आहे.