वाढत्या कोरोनाबाधितांच्या सूचीत केंद्रशासनाकडून सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचे नाव समाविष्ट

सातारा – गत २ आठवड्यांत देशातील कोरोनाबाधित रुग्ण वाढलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश केला आहे. याविषयीची माहिती केंद्र सरकारने नुकतीच घोषित केली आहे.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून रुग्णांच्या नातेवाइकांना ‘ऑक्सिजन बेड’साठी धावाधाव करावी लागत आहे. सातारा जिल्ह्यात १३ ते १९ एप्रिल या कालावधित ८ सहस्र ९५८, २० ते २६ एप्रिल या कालावधीत १२ सहस्र १९४ आणि २७ एप्रिल ते ३ मे या कालावधीत १५ सहस्र ३२८ रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच १० मे पर्यंत जिल्ह्यात कडक दळणवळण बंदी लागू केली आहे. जिल्ह्यात केवळ औषधालये चालू असून अन्य व्यवहार पूर्णत: बंद करण्यात आले आहेत. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या आहेत.