बाळ्ळी येथे ‘बालरथ’ उलटला : २४ विद्यार्थी घायाळ

कुंकळ्ळी येथील कुंकळ्ळी युनायटेड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ‘बालरथ’ ७ डिसेंबर या दिवशी सकाळी रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. ‘बालरथ’मधील ३४ पैकी ४ विद्यार्थी गंभीररित्या घायाळ झाले आहेत, तर २१ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

हद्दपार केलेला बांगलादेशी नागरिक पुन्हा गोव्यात !

भारत हा बांगलादेशी घुसखोरांसाठी नंदनवन ठरू नये ! भारत सरकारने लवकरात लवकर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा करून तो कार्यवाहीत आणावा !

उत्तरप्रदेश शासन सरकारी कामकाजातून हटवणार उर्दू आणि फारसी शब्द !

योगी आदित्यनाथ शासनाच्या या आणखी एका अभिनंदनीय निर्णयाचे अन्य भाजपशासित राज्यांनी अनुकरणे करावे, अशी हिंदूंना अपेक्षा आहे !

(म्हणे) ‘हिंदूंच्या मंदिरात हत्या आणि मुलींवर बलात्कार होत असल्याने तेथे जाणे बंद करा !’ – आम आदमी पक्षाचे आमदार राजेंद्र पाल गौतम

मशिदी, मदरसे, चर्च यांमध्ये जे काही घडत असल्याचे दिसून येते, त्याविषयी राजेंद्र पाल गौतम कधी विधान करणार नाहीत; कारण त्याचे परिणाम त्यांना ठाऊक आहेत !

काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांनी घेतली तेलंगाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ !

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला पराभूत करून काँग्रेसला सत्तेत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारेे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाले आहेत.

अयोध्येतील श्रीराममंदिरात पूजा करण्यासाठी २४ पुजार्‍यांच्या प्रशिक्षणाला आरंभ !

त्यांच्या रहाण्याची आणि भोजनाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली असून हे सर्व श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने करण्यात येत आहे.

‘महर्षी अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्याला आशीर्वाद आहे !’- पद्मभूषण डॉ. पं. गोकुळोत्सव महाराज, इंदूर, मध्यप्रदेश

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने विद्यालयाच्या संगीत विभागाच्या समन्वयक कु. तेजल पात्रीकर यांनी पद्मभूषण डॉ. पं. गोकुळोत्सव महाराज यांची ३ डिसेंबर २०२३ या दिवशी भेट घेतली. या वेळी ‘माझे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्याला आशीर्वाद आहेत’, असे त्यांनी सांगितले.

Garba UNESCO : गुजरातच्या गरब्याला ‘युनेस्को’च्या ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ सूचीत स्थान !

गुजरातमधील जगप्रसिद्ध धार्मिक नृत्य असलेल्या गरब्याला संयुक्त राष्ट्रांच्या ‘युनेस्को’ संस्थेने ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ सूचीत समाविष्ट केले आहे. केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी या निर्णयाची माहिती त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून दिली.

NCERT : ‘इंडिया’ आणि ‘भारत’ यांच्यात भेद करत नाही ! – एन्.सी.ई.आर्.टी.

नवीन अभ्यासक्रम आणि पुस्तके बनवण्याची प्रक्रिया चालू असल्याने यावर आता बोलणे घाईचे ठरणार असल्याचे स्पष्टीकरण