१ जानेवारीपासून नवीन धोरण लागू होणार !
नवी देहली – भारतीय सैन्याने बढतीच्या संदर्भातील नियमावलीत महत्त्वपूर्ण पालट केले असून नवीन सर्वसमावेशक पदोन्नती धोरण सिद्ध केले आहे. कर्नल आणि त्यावरील पदांच्या अधिकार्यांच्या निवडीसाठी पदोन्नती धोरणाची सर्वसमावेशक नियमावली अंतिम करण्यात आली आहे. हे धोरण १ जानेवारी २०२४ पासून लागू होईल. नवीन पदोन्नती धोरण सैन्यदलाच्या सतत पालटत्या आवश्यकतांशी सुसंगत असणार आहे, अशी माहिती सैन्याधिकार्यांनी दिली आहे.
१. अधिकार्यांनुसार नवीन धोरणात बढतीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मेजर जनरल या उच्च पदावर असलेल्या अधिकार्यांना पुढील म्हणजे लेफ्टनंट जनरल या पदासाठीच्या संधीही यातून प्रदान करण्यात आली आहे.
२. सध्या भारतीय सैन्याचे मनुष्यबळ व्यवस्थापन विविध धोरणे आणि तरतुदी यांद्वारे नियंत्रित केले जाते. हे विविध निवड मंडळांसाठी एकसमान नाहीत. नवे धोरण सर्व निवड मंडळांच्या धोरणांमध्ये समानता आणणारे असेल.