भाग्यनगर (तेलंगाणा) – विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला पराभूत करून काँग्रेसला सत्तेत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारेे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाले आहेत. ७ डिसेंबर या दिवशी रेवंत रेड्डी यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या वेळी भट्टी विक्रमारका यांनी उपमुख्यमंंत्रीपदाची शपथ घेतली. या शासकीय कार्यक्रमासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित होते. रेवंत रेड्डी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या भाजपच्या विद्यार्थी संघटनेतून सामाजिक कार्याला प्रारंभ केला. तेलुगु देसम्, भारत राष्ट्र समिती आणि नंतर काँग्रेस असा राजकीय प्रवास मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केला आहे.
सौजन्य लाईव हिंदुस्तान