पाकमधील ८ वर्षांच्या हिंदु मुलावरील ईशनिंदेच्या आरोपाविरोधात भारतातील धर्मप्रेमींकडून #SaveHinduBoyInPak ट्रेंड !

पाकमध्ये ८ वर्षांच्या हिंदु मुलावर ईशनिंदेचा गुन्हा नोंदवून त्याच्यावर खटला चालवण्यात येत आहे. त्याला या प्रकरणात फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

नास्तिकतावाद्यांच्या भूलथापांना बळी न पडता धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यासाठी अनुमती द्यावी !

धर्मरक्षणासाठी पुढाकार घेणारे भाजपचे श्री. संगठन शर्मा यांचे अभिनंदन ! हिंदु धर्मशास्त्रानुसार सण-उत्सव साजरे करण्याची तळमळ किती हिंदुत्वनिष्ठ नेत्यांमध्ये आहे ?

वर्ष २१०० पर्यंत मुंबईसह भारताच्या किनारपट्टीवरील १२ शहरे पाण्याखाली जाणार !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या अहवालानुसार हवामान पालटाच्या संकटामुळे पुढील ८० वर्षांत म्हणजे वर्ष २१०० पर्यंत भारताच्या किनारपट्टीवरील मुंबईसह १२ शहरे ३ फुट पाण्यासाखाली जाण्याची शक्यता आहे.

१७ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने शाळा चालू होणार ! – वर्षा गायकवाड

१७ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने राज्यातील शाळा चालू करण्यात येणार आहेत. शहरी भागात आयुक्त, तर ग्रामीण भागात जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली

मोठ्या आस्थापनांकडून अल्प दर्जाच्या मधाची विक्री करून ग्राहकांची फसवणूक !

अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट, मधाच्या ८६ नमुन्यांपैकी ५२ नमुने न्यून दर्जाचे आढळले, ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या आरोग्याशी खेळणार्‍या मोठ्या आस्थापनांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

मंत्रालयात आढळल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या !

मंत्रालय कि मद्यालय ? राज्याचे प्रशासकीय कामकाज चालणार्‍या ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळणे, हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यासाठी लज्जास्पदच !

आजपासून लोकल प्रवासासाठी रेल्वेस्थानकांवर ‘ऑफलाईन’ पास उपलब्ध !

मुंबईत लोकलमधून प्रवास करता येण्यासाठी लागणारा पास देण्याची ‘ऑफलाईन’ प्रकिया ११ ऑगस्टपासून चालू करण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईतील ५३ रेल्वेस्थानकांवर ३५८ साहाय्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

आझाद मैदानावरील दंगलीच्या ९ वर्षांनंतरही पोलीस न्यायाच्या प्रतीक्षेत !

महाराष्ट्रातील महिला पोलिसांच्या अब्रूला हात घालण्याचे आणि सैनिकांच्या त्यागाचे प्रतीक असलेले ‘अमर जवान’ हे स्मारक लाथ मारून तोडण्याचे कुकृत्य धर्मांधांनी केले, तो ११ ऑगस्ट २०१२ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस !

अटकेला आव्हान देणारी राज कुंद्रा यांची याचिका न्यायालयाने फेटाळली !

कुंद्रा यांच्यासह त्यांच्या आस्थापनाचे ‘आयटी’ प्रमुख रायन थॉर्पे यांचीही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

निनावी दूरभाष करून मुंबईत ४ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देणार्‍या २ युवकांना अटक !

पोलिसांनी रात्रभर राबवली शोधमोहीम !
मुंबई पोलिसांच्या वेळेचा अपव्यय करणार्‍यांवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! – संपादक