माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील ‘एन्आय् टी ’ महाविद्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाची धाड !

अनिल देशमुख अध्यक्ष असलेल्या ‘श्री साई शिक्षण संस्थे’च्या अंतर्गत या महाविद्यालयाचे कामकाज चालत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ‘श्री साई शिक्षण संस्थे’च्या कार्यालयावर यापूर्वीही धाड टाकली होती.

कोरोनावरील लसीचे दोन डोस घेतलेल्यांच्या लोकलच्या प्रवासासाठी दोन दिवसांत निर्णय ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

भाजपने याविषयी केलेल्या आंदोलनाच्या संदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘हा राजकारणाचा विषय नाही. नागरिक जसे समजून घेत आहेत, तसे राजकारण्यांनीही समजून घ्यावे.’’

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यामधील गाड्यांचा हिंगोली येथे अपघात !

ताफ्यातील अग्नीशमनदलाच्या गाडीचे ‘ब्रेक फेल’ झाल्याने ती गाडी पुढील गाड्यांवर आदळली. यामध्ये ३ गाड्यांची किरकोळ हानी झाली.

कोरोनावरील २ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्यास मिळण्यासाठी मुंबईत भाजपकडून आंदोलन !

भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

चंद्रकांत पाटील यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट !

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि मनसे यांच्यामध्ये युती होण्याची शक्यता यातून व्यक्त केली जात आहे.

१७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा चालू होणार ! – वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात लागू करण्यात आलेल्या कोरोनाविषयक नियमावलीच्या आधीन राहून शाळा चालू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

राज कुंद्रा यांच्या अश्लील (पॉर्न) चित्रपट बनवण्याच्या प्रकरणात गोव्यातील ३ ‘मॉडेल्स’चा सहभाग

मुंबई पोलीस या तिन्ही ‘मॉडेल्स’ना जबानी नोंदवण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबई येथे येण्यासाठी ‘समन्स’ पाठवू शकते.

मुंबईप्रमाणेच विश्वभरात पूरस्थिती निर्माण झाली असून तेथील महापालिका आमच्या नियंत्रणात नाहीत !

महाराष्ट्रात जुलै २०२१ मध्ये पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे मुंबईचीही पुष्कळ हानी झाली होती.

इयत्ता १२ वीच्या बोर्डाच्या निकालावरच पदवीधर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया होईल ! – उदय सामंत, उच्च शिक्षणमंत्री

उदय सामंत म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तुकड्या किंवा विद्यार्थी यांची आवश्यकता असेल, तर ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव पाठवावा.

बसमधली गर्दी चालते, मग लोकलमधील गर्दी का नाही ? – उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले

‘अन्य शहरांच्या तुलनेत मुंबई शहरातील नागरिकांच्या गरजा वेगळ्या आहेत. ‘लोकल प्रवास’ ही मुख्य गरज आहे’, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पत्रकारांना लोकलने प्रवास करण्यावर बंदी असल्याची माहिती समजल्यानंतर यावर उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.