पुढील काही वर्षे कोरोनाची चाचणी अनिवार्य करावी लागेल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘सध्या राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता १ सहस्र ३०० मेट्रिक टन इतकी आहे. राज्यातील ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यास दीड वर्ष लागेल.

नवाब मलिक यांचा ‘अंडरवर्ल्ड’शी संबंध, शरद पवार यांना पुरावे पाठवणार ! – देवेंद्र फडणवीस

मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचे अमली पदार्थांचा पुरवठादार जयदीप राणा याच्यासमवेत असलेले छायाचित्र प्रसारित केले आहे.

अखेर अनिल देशमुख अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित !

१०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांवरून अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांना वारंवार समन्स बजावले होते. तरीही ते चौकशीसाठी उपस्थित रहात नव्हते.

आर्यन खान याच्या सुटकेचे वृत्तसंकलन करण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची आर्थर रोड कारागृहाबाहेर झुंबड

काळ्या पाण्याची शिक्षा भोगणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खलनायक ठरवणार्‍या वाहिन्या अमली पदार्थांशी संबंधित आरोप असलेल्या व्यक्तीच्या सुटकेची वृत्ते दिवसभर दाखवून टी.आर्.पी.साठी त्यांचे उदात्तीकरण करतात, हे लक्षात घ्या

तुळजापूर आणि शनिशिंगणापूर या देवस्थानांकडे सरकार ५ वर्षे फिरकलेच नाही ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

एकीकडे शासनाला स्वत:चे उद्योग धड चालवता येत नसल्यामुळे ते विकावे लागत आहेत. मग कोणत्या तोंडाने सरकार ‘आम्ही मंदिरांचे व्यवस्थापन करू’, असे म्हणते ?

दिवाळीमध्ये हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालण्याच्या मागणीसाठी ट्विटरवर ट्रेंड !

#Halal_Free_Diwali  या हॅशटॅगवर ३० सहस्र ट्वीट्स करण्यात आले. याद्वारे हलाल प्रमाणपत्र असणार्‍या उत्पादनांवर बहिष्कार घालून ‘हलाल मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले.

समीर वानखेडे यांना अटकेपूर्वी ३ दिवस अगोदर नोटीस द्यावी !

मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

महाविकास आघाडीकडून चौकशी; मात्र शासनाच्या जलसंधारण विभागाकडून जलयुक्त शिवार योजनेविषयी सकारात्मक अहवाल !

योजनेत अनियमितता असल्याचे कारण देत महाविकास आघाडी शासनाने विशेष चौकशी पथकाकडून जलयुक्त शिवार योजनेची चौकशी चालू केली. शासनाच्याच जलसंधारण विभागाने या योजनेविषयी सकारात्मक अहवाल सादर केला आहे. या योजनेमुळे शेतीची उत्पादकता वाढली असल्याचे जलसंधारण विभागाकडून नमूद करण्यात आले आहे.

जहाजावरील अमली पदार्थांच्या पार्टीच्या आयोजकांची चौकशी करा ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

मलिक म्हणाले, ‘‘कॉर्डेलिया क्रूझ’ला कोणत्याही प्रकारची अनुमती देण्यात आली नव्हती. असे असतांना जहाज कसे सोडले ? जहाजावर ‘रेव्ह पार्टी’ होती, तर या पार्टीत सहभागी असलेल्या सर्व लोकांची पडताळणी का केली नाही ?

‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील कारवाईच्या प्रकरणी आर्यन खान याच्यासह दोघांना जामीन संमत !

या प्रकरणी अधिवक्ता सुभाष झा आणि अधिवक्ता अंबरीष मिश्रा यांनी म्हटले, ‘‘न्यायालयात जामिनासाठी १०० अर्ज प्रलंबित असतांना आर्यन खान यालाच जामीन मिळाला.’’