मुंबई – मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकार्यांनी १५ मार्च या दिवशी आय.पी.एल्.ची बस फोडली. खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईच्या व्यावसायिकांना न दिल्याने मनसेने अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी म्हटले की, आम्ही गुंडगिरी केली हे जाणून घ्या. आय.पी.एल्. महाराष्ट्रामध्ये, मग आय.पी.एल्.मध्ये वापरल्या जाणार्या बसगाड्या देहलीतून का मागवता ? सरकार एका बाजूला म्हणत की, आय.पी.एल्. महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे अर्थचक्राला गती मिळेल; मग महाराष्ट्राच्या वाहतूदारांना यातून वंचित का ठेवले जाते ? आमच्या हक्कासाठी तोडफोड करूनही हक्क मिळाला नाही, तर पुढेही तोडफोड करू. याविषयी आय.पी.एल्. व्यवस्थापन आणि सरकार यांना विनंती करूनही काही पालट झाला नाही, त्यामुळे हे पाऊल उचलले.
मनसेने आय.पी.एल्.ची बस फोडली !
नूतन लेख
- मुंबईतील गिरगाव येथे ‘मराठी भाषाभवन’ बांधणार !
- Taiwan Office In Mumbai : मुंबईत तैवानचे कार्यालय चालू केल्याने चीन संतप्त !
- शिरस्त्राण परिधान न केलेल्या दुचाकीचालकाची अनुज्ञप्ती रहित करणार ! – गोवा पोलीस
- दादर रेल्वेस्थानकाबाहेरील रस्त्याला मद्यपींच्या अड्डयाचे स्वरूप !
- जैन विकास आर्थिक महामंडळावरील श्वेतांबर जैन सदस्यांच्या निवडीला दिगंबर जैन समाजाचा विरोध !
- स्वच्छता अभियानात कोल्हापूर जिल्ह्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम !