
मुंबई – मढ-मार्वे येथील अवैध स्टुडिओ प्रकरणी मुंबई महापालिकेकडून चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करणार आहे. ही समिती १ मासात अहवाल सादर करणार आहे. मढ-मार्वे येथे महाविकास आघाडी सरकारच्या काळात ४९ चित्रपट स्टुडिओ बांधण्यात आले.
या प्रकरणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला होता. काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांनी हा स्टुडिओ बांधल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. या प्रकरणी सी.आर्.झेड.च्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांचाही या प्रकरणाशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे.
४ वर्षांनंतरही चौकशी अहवाल उघड न केल्यावरून अनिल देशमुख यांची राज्यपालांकडे तक्रार !
स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल २० जून या दिवशी !
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद