पालघर येथील ४ यात्रेकरूंचा उत्तराखंड येथे अपघातात मृत्यू !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तातडीने साहाय्य !

मुंबई, ११ सप्टेंबर (वार्ता.) – उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील चौघा यात्रेकरूंचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि अपघातातील घायाळ झालेल्यांना ऋषिकेश येथील एम्स् रुग्णालयात वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. मृत्युमुखी पडलेल्या चौघा यात्रेकरूंचे पार्थिव राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालत ते मुंबई येथे आणून नातेवाइकांकडे सुपुर्द करण्यात आले.

अपघातात मनोर येथील जितेश लोखंडे, वसई येथील धर्मराज खाटेकर, पुरुषोत्तम खिलखुटी आणि दहिसर येथील शिवाजी बुधकर यांचा मृत्यू झाला, तर इतर दोघे घायाळ झाले.