धारावी (मुंबई) येथील रुबीना खान (पूर्वाश्रमीची यशोधरा खाटीक) हिचा संशयास्पद मृत्यू, हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार ! – कुटुंबियांचा आरोप

रुबीना खान हिचा पती रेहान खान याला अटक

मुंबई – मध्यप्रदेशातील हिंदु कुटुंबातील एका विवाहितेचा धारावीत संशयास्पद मृत्यू झाला. ‘तिची हत्या करून तिला फासावर लटकवण्यात आले, तसेच हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार आहे’, असा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. धारावी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिचा पती रेहान खान (वय २९ वर्षे) याला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे. मृत महिलेचे माहेरचे नाव यशोधरा खाटीक (वय २४ वर्षे) असे असून सासरचे नाव रुबीना खान असे होते.

‘वर्ष २०१९ मध्ये रेहान खान याने यशोधरा हिला पळवून मुंबईत आणून तिच्याशी इस्लामप्रमाणे विवाह केला होता. त्यानंतर तो धारावीत रहात होता. तो तिच्यावर गोमांस खाण्यासाठी बळजोरी करत होता, तसेच मद्य पिऊन तिला मारहाणही करत होता. त्याने पत्नीचे बलपूर्वक धर्मांतर करून तिचे नाव पालटून ‘रुबीना’ असे ठेवले’, असे आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केले आहेत.

संपादकीय भूमिका 

वारंवार घडणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या घटना, या ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची अनिवार्यता अधोरेखित करतात !