मुंबईत चुनाभट्टी येथे भीषण अपघात, एकाचा मृत्‍यू !

चुनाभट्टी येथे मुंबई ईस्‍टर्न एक्‍सप्रेस हायवेवरून भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने ४ वाहनांना धडक दिली. यामध्‍ये एकाचा जागीच मृत्‍यू झाला असून ३ जण गंभीर घायाळ आहेत.

शरद पवार यांच्‍यापासून महाराष्‍ट्रातील राजकारणाच्‍या र्‍हासाला प्रारंभ !

भविष्‍यात हा ‘सैतान’ गावगाड्यापर्यंत परत येता कामा नये, अशी टीका ‘रयत क्रांती संघटने’चे अध्‍यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्‍यावर केली. खोत हे प्रसिद्धीमाध्‍यमांसमोर बोलत होते.

अंधेरी (मुंबई) येथे श्रीराम मंदिराजवळील भूमी कब्रस्थानासाठी देण्याची शिवसेनेच्या नेत्यांची मागणी !

श्रीरामाच्या मंदिराजवळ कब्रस्तानाची मागणी हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या सरकारमधील नेत्याने करणे हे दुर्दैवी आहे. श्रीरामाच्या मंदिराजवळ कब्रस्तानासाठी जागा दिल्यास विरोध करू, अशी भूमिका सकल हिंदु समाजाकडून करण्यात आली आहे.

महापुरुषांनी शिक्षण घेतलेल्या शाळांमध्ये महाराष्ट्र शासन त्यांच्या कार्याचे संग्रहालय उभारणार !

राज्यशासनाचा अभिनंदनीय निर्णय ! विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान निर्माण होण्यासाठी राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा पाठ्यपुस्तकांमध्येही समावेश करावा !

शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट यांच्या सर्व आमदारांना विधानसभेच्या अध्यक्षांची नोटीस !

दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्याविषयी अध्यक्षांना पत्र देण्यात आले होते, तसेच सर्वाेच्च न्यायालयातही दोन्ही पक्षांकडून याचिका करण्यात आली होती. विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा, असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार ही नोटीस अध्यक्षांनी पाठवली आहे.

मुंबईतील भिकार्‍याचे मासिक उत्पन्न ७५ सहस्र रुपये !

घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने शिक्षण घेता आले नाही; म्हणून मुंबईतच वेगवेगळ्या रस्त्यांवर भीक मागणे त्याने चालू केले. या भिकार्‍याचे लग्न झाले असून त्याच्या कुटुंबात भावासह वडील आणि स्वतःची दोन मुलेही आहेत.

ठाणे येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात, २ जण घायाळ !

बस आणि कंटेनर यांची धडक झाल्याने वाहक बसलेल्या बसच्या दर्शनी भागाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या वेळी बसमध्ये ९ प्रवासी होते. त्यामधील बस वाहक अमर परब आणि प्रवासी महिला गीता कदम हे दोघे घायाळ झाले आहेत.

विद्यार्थ्‍यांनी एन्.एम्.एम्.टी.च्‍या सुधारित बसपास योजनेचा लाभ घ्‍यावा ! – योगेश कडूस्‍कर, परिवहन व्‍यवस्‍थापक

विद्यार्थ्‍यांना शाळेत ये-जा करणे, जादा तासिका आणि शिकवणी  यासाठी ये-जा करणे सोयीचे होणार आहे. यांसाठी त्रैमासिक बस पासप्रमाणे ‘नो-पंचिंग’ (जादा फेर्‍या प्रवास) करण्‍यास सवलत देण्‍यात आली आहे.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्‍ट कालावधीत होणार !

७ जुलै या दिवशी विधीमंडळाच्‍या कामकाज सल्लागार समित्‍यांची बैठक झाली. या वेळी विधानसभेचे अध्‍यक्ष अधिवक्‍ता राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्‍या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी ही घोषणा केली.

भाजप नेत्‍या पंकजा मुंडे २ मास राजकारणापासून अलिप्‍त रहाणार !

ध्‍याच्‍या राजकीय घडामोडींच्‍या पार्श्‍वभूमीवर भाजप नेत्‍या सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्‍यांच्‍या काँग्रेसमध्‍ये जाण्‍याविषयी चालू असलेल्‍या चर्चेवर प्रहार करत त्‍या म्‍हणाल्‍या की, मी कधी राहुल गांधी यांना भेटलेलीही नाही.