मुलुंड (मुंबई) येथील मुक्‍तेश्‍वर आश्रमात विविध विषयांवर व्‍याख्‍यानमाला  !

सौ. नयना भगत

मुलुंड मुलुंड पश्‍चिम येथील मुक्‍तेश्‍वर आश्रमाच्‍या वतीने भक्‍तांसाठी व्‍याख्‍यानमालिकेचे आयोजन करण्‍यात आले होते. गेल्‍या मासात प्रत्‍येक सोमवारी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत ही व्‍याख्‍याने झाली. सनातन संस्‍थेच्‍या सौ. नयना भगत यांचे ‘लव्‍ह जिहादहलाल जिहादधर्मांतर’, सौ. धनश्री केळशीकर यांचे ‘धर्मशिक्षणाची आवश्‍यकता’ आणि श्री. प्रसाद वडके यांचे ‘गुरुशिष्‍य परंपरा’ या विषयांवर व्‍याख्‍यान झाले. तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांचे ‘हिंदु धर्माचे अद्वितीयत्‍व’ आणि श्री. सुनील कदम यांचे ‘हिंदु राष्‍ट्राची घटनात्‍मक मागणी’ या  विषयांवर व्‍याख्‍यान झाले.

मार्गदर्शन करतांना सौ. नयना भगत
मार्गदर्शन करतांना श्री. प्रसाद वडके

या वेळी आश्रमातील साधकांनी हे विषय ऐकल्‍यावर विचारलेल्‍या शंकांचे समाधान व्‍याख्‍यात्‍यांनी केले.

वैशिष्‍ट्यपूर्ण प्रतिसाद !

. व्‍याख्‍यानातील विषयांचे वास्‍तव लक्षात आल्‍यावर आश्रमातील भक्‍तांनी त्‍या संदर्भातील ग्रंथांची मागणी केली.

. व्‍याख्‍यानातून ‘मंदिरांतील वस्‍त्रसंहिता’ हा विषय लक्षात आल्‍यावर आश्रमातील एका महिला भक्‍तांनी आश्रमात दर्शनासाठी जीन्‍स परिधान करून आलेल्‍या एका युवतीचे प्रबोधन केले. 

. ‘व्‍याख्‍यानातून समजलेले विषय, उदा. लव्‍ह जिहाद, हलाल जिहाद आणि धर्मांतर याविषयी आपल्‍या घरात जागृती करूया’, असे आवाहन आश्रमाचे विश्‍वस्‍त श्री. गुरुनाथ दळवी यांनी उपस्‍थितांना केले.