संमेलन कि मनोरंजन ?
९४ वे मराठी साहित्य संमेलनासंदर्भात ‘पंचतारांकित संमेलनाच्या नादात महामंडळाचा हेतू आणि धोरणे यांचा बळी दिला गेला’, अशी टीका केली गेली होती. ‘देश आर्थिक संकटात असतांना लोकवर्गणीतून मिळालेल्या पैशांची उधळपट्टी आणि असा भपकेबाजपणा उद्गीर येथील संमेलनात होणे अपेक्षित नाही.’