संतांच्या प्रत्येक साहित्यात पर्यावरणाविषयी सखोल माहिती ! – प्रा. किरण वाघमारे, अकोला
ज्ञानेश्वरीच्या पानापानांत पर्यावरण आहे. समर्थ रामदासस्वामी यांनी ‘बाग’ या विषयावर दासबोधात वर्णन केले असून त्यात २८ समास पर्यावरणाला वाहिले आहेत. यात ३०० वृक्षांची माहिती आहे. त्यामुळे संतांच्या प्रत्येक साहित्यात पर्यावरणाविषयी सखोल माहिती आहे, असे मत अकोला येथील प्रा. किरण वाघमारे यांनी व्यक्त केले.