९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप !

समारोपाच्या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

समाजाला वैचारिकतेकडे नेणे, हे माध्यमांचे दायित्व असायला हवे ! – गिरीष कुबेर, संपादक, दैनिक लोकसत्ता

‘वृत्तमाध्यमाचे मनोरंजनीकरण’ या विषयावर परिसंवाद

साहित्य मंडळ कि राजकारण्यांचे बटीक ?

राज्यकर्ते राजकीय हेतू सोडून साहित्यिक म्हणून सहभागी होतील आणि देणगीदार जेव्हा श्री सरस्वतीदेवीच्या चरणी अर्पण समजून देणगी देतील, तेव्हाच खर्‍या अर्थाने वादातीत साहित्य संमेलने होतील अन् साहित्याचे खर्‍या अर्थाने उत्थान होईल.

(म्हणे) ‘कुटुंबव्यवस्था व्यक्तीस्वातंत्र्यसाठी मारक !’

कुटुंबव्यवस्थेमुळेच आज जगातील सर्वांत प्राचीन हिंदु संस्कृती लाखो वर्षे टिकून आहे. कुटुंबव्यवस्थेतील बंधने प्रत्येक व्यक्तीचे जीवन संयमित करून स्थिर करतात आणि अंतिमतः सुखावह करतात, हे लक्षात घेतले पाहिजे !

मराठी भाषेचा विकास, हाच आपल्या सर्वांचा ध्यास आहे !

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा, तसेच शिक्षणातही मराठी  भाषेला अग्रस्थान मिळावे, यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत. मराठी भाषेचा विकास, हाच आपल्या सर्वांचा ध्यास आहे. मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती एक संस्कृती आहे.

साहित्य संमेलनात श्री सरस्वतीपूजन करायचे नसेल, तर वेगळे विद्रोही साहित्य संमेलन घेणे बंद करा ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

जे समाजाच्या हितासाठी असते, त्याला ‘साहित्य’ म्हणतात; मात्र समाजहित साधले जात नसेल, तर त्याला मी ‘नाहित्य’ संमेलन मानतो. हे संमेलन नास्तिकवाद्यांचे आहे कि डाव्या विचारवाद्यांचे आहे ? असा प्रश्न पडतो.

साहित्यिकांनो, सरस्वतीपुत्र व्हा !

सरस्वतीदेवीची उपासना नाकारून नाशिकमधील साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी हा नतद्रष्टपणा केला. ज्याप्रमाणे संतांनी मराठी साहित्य समृद्ध केले, त्याप्रमाणे साहित्यिकांनी श्री सरस्वतीदेवीचे पूजक होऊन मराठी भाषा समृद्ध करावी !

(म्हणे) ‘अन्य भाषांतील (परकीय) शब्द घेतल्याविना आपली भाषावृद्धी होणार नाही !’ – रामदास भटकळ, ज्येष्ठ साहित्यिक

‘परकीय शब्द वापरणे, म्हणजे ‘औरस मुले मारून अन्य मुले दत्तक घेत सुटणे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते, हे साहित्यिक लक्षात घेतील का ?

अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या व्‍यासपिठावर एकही मराठी शब्‍द न उच्‍चारता केले ‘प्रमुख पाहुणे’ म्‍हणून भाषण !

जावेद अख्‍तर यांनी मराठी भाषेची थोरवी सांगितली; मात्र त्‍याच मराठीचा गौरव करण्‍यासाठीच्या संमेलनात त्‍यांनी मराठीचा असा उपमर्द का केला ?

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात श्री सरस्वतीदेवीच्या पूजनाची परंपरा खंडित !

मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांचा हिंदुद्वेष जाणा !