वर्धा येथील अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनात राजकीय मंडळींची लगबग अधिक !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते उद़्‍घाटन !

वर्धा – येथे ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या ९६ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे उद़्‍घाटन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते होणार आहे, तर समारोप उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि सांस्‍कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार करणार आहेत.

संमेलनाच्‍या कार्यक्रम पत्रिकेत उद़्‍घाटनापासून ते समारोपापर्यंत राजकीय नेत्‍यांचीच नावे अधिक प्रमाणात आहेत. धाराशिव येथे १० जानेवारी २०२० या दिवशी ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन झाले होते. हे संमेलन अराजकीय ठरले; कारण उद़्‍घाटन सोहळा ते समारोप यात व्‍यासपिठावर राजकीय व्‍यक्‍ती नव्‍हत्‍या.