शहादा (जिल्हा नंदुरबार) – येथील गर्भवती महिलेला अचानक पोटात कळा येऊ लागल्याने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथील आधुनिक वैद्यांनी तिची पडताळणी केल्यानंतर तिला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले; मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका १५ दिवसांपासून नादुरुस्त असल्याने दुसर्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका मागवावी लागली. ती येण्यास दीड घंटा लागला. त्यामुळे रुग्णवाहिकेतून घेऊन जात असतांना महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली.
संपादकीय भूमिकारुग्णवाहिका १५ दिवसांत दुरुस्त का झाली नाही ? किंवा तिला पर्यायी व्यवस्था का दिली गेली नाही ? यासाठी उत्तरदायी असणार्यांवर कारवाई व्हायला हवी ! |