मौलाना, पाद्री आणि भंते यांच्‍याकडून चमत्‍कार सिद्ध करून दाखवल्‍यास ५१ लाखांचे पारितोषिक देऊ ! – महंत अनिकेतशास्‍त्री जोशी

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा उद्देश भरकटला आहे. फक्‍त आणि फक्‍त हिंदु धर्मगुरूंना लक्ष्य केले जात आहे. त्‍यामुळे हा कायदा महाराष्‍ट्रातून लवकरात लवकर रहित करावा.

‘सक्‍सेशन डीड’ आणि ‘हेअरशिप सर्टिफिकेट’ यांचे महत्त्व !

दोन्‍ही कागदपत्रे एकसारखी भासत असली, तरी ते पूर्णपणे भिन्‍न आहेत, तसेच ते मिळवण्‍याच्‍या पद्धतीही भिन्‍न आहेत.

पाकमधील ईशनिंदा कायद्यातील शिक्षा अधिक कठोर केल्यावरून पाकिस्तान  मानवाधिकार आयोगकडून चिंता व्यक्त !

भारतात हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा सातत्याने अवमान केला जात असतांना कुणालाही शिक्षा होत नाही, तर पाकमध्ये शिक्षा अधिक कठोर केली जात आहे, हे हिंदूंना लज्जास्पद !

‘हिंदु विवाह कायद्या’नुसार आंतरधर्मीय विवाह अवैध ! – सर्वोच्च न्यायालय

आंतरधर्मीय विवाह ‘हिंदु विवाह कायद्या’नुसार रहित ठरतो. या कायद्यानुसार केवळ हिंदूच लग्न करू शकतात, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तेलंगाणातील एका हिंदु महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पतीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

‘लव्ह जिहाद’विरोधी आणि ‘धर्मांतर बंदी’ कायदे त्वरित करा !

बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. या वेळी उपस्थित राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांनी ‘महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधी आणि ‘धर्मांतर बंदी’ हे कायदे त्वरित करावेत’, तसेच वक्फ कायदा रहित करावा, अशा मागण्या शासनाकडे केल्या.

संपूर्ण भारतात धर्मांतरबंदी कायदा लागू करावा !

महाराष्‍ट्रासह संपूर्ण भारतात धर्मांतरबंदीचा कायदा लागू करावा, या मागणीला वाचा फोडण्‍यासाठी आणि याकडे सरकारचे लक्ष वेधण्‍यासाठी या मोर्च्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते.

वस्तू आणि सेवा कर भरण्याविषयीच्या अडचणी सोडवण्यासाठी आज कुडाळ येथे सभा

या सभेला जी.एस्.टी.च्या अनुषंगाने अडचणी असलेल्या सर्व संबंधितांनी वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर आणि सागर तेली यांनी केले आहे.

निकाल देण्यास २ मास विलंब झाल्याने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडून पक्षकरांची क्षमायाचना

न्यायमूर्ती गवई म्हणाले की, या निकालास विलंबामुळे प्रथम आपली क्षमा मागतो. या खटल्यात कायद्यातील नियम, तथ्य, तरतुदी यांविषयीच्या गोष्टींचा मला अभ्यास करावा लागला, त्यामुळे वेळ लागला.

नाशिक महापालिकेच्या माजी वैद्यकीय अधीक्षक दांपत्यासह ९ आधुनिक वैद्य आणि ११ जण यांवर खटला प्रविष्ट !

अवैध सोनोग्राफीचा व्यवसाय केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी आणि त्यांची पत्नी यांच्यासह ९ आधुनिक वैद्य आणि ११ जण यांच्यावर नाशिक महापालिकेने नाशिक रोड न्यायालयात खटला प्रविष्ट केला आहे.

समान नागरी कायद्याचे परीक्षण करणार्‍या समितींच्या स्थापनेला सर्वोच्च न्यायालयाची अनुमती

‘राज्यघटनेच्या अनुच्छेद १६२ च्या अंतर्गत या समितींची स्थापना करण्यात आली आहे. यात चुकीचे काय आहे ? तुम्ही याचिका मागे घेणार कि आम्ही ती फेटाळून लावू ?