नृसिंहवाडीतील (जिल्हा कोल्हापूर) श्रींच्या पादुका स्थापनेला ५८८ वर्षे पूर्ण !
भगवान श्री दत्तात्रेय यांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी कृष्णा-पंचगंगा या नद्यांच्या संगमस्थानी, गाणगापूर येथे प्रयाण करण्यापूर्वी जनकल्याणाच्या हेतूने औदुंबर वृक्षाखाली स्वहस्ते या श्रीपादुका स्थापन केल्या.