आर्.बी.एल्. बँकेद्वारे कोल्हापुरातील १०१ गरजू मुलींना सायकल आणि शालोपयोगी वस्तू यांचे वाटप !
आर्.बी.एल्. बँकेने त्यांच्या सी.एस्.आर्. उपक्रम – उमीद १०००च्या अंतर्गत कोल्हापुरातील १०१ गरजू मुलींना सायकल आणि शालोपयोगी वस्तू यांचे वाटप केले. हे वाटप जिल्हा परिषद येथे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.