
शिमला – हिमाचल प्रदेशात पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे १३६ रस्ते बंद झाले आहेत. राज्याची अनुमाने १ सहस्र कोटी रुपयांची हानी झाली आहे. ‘हिमाचल प्रदेश राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणा’चे विशेष सचिव पुष्पिंदर राणा यांनी सांगितले की, कुठल्याही आणीबाणीच्या परिस्थितीत त्वरित प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला तात्काळ साहाय्य पुरवले जात आहे.
शिमला येथील भट्टा कुफर फळ बाजाराच्या वर असलेल्या शिवमंदिराजवळ दरड कोसळल्याने टेकडीवरून दगड-माती मोठ्या प्रमाणात खाली कोसळले. यामुळे भट्टा कुफर फळ बाजारात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची हानी झाली. राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये ६६ जणांचा मृत्यू झाला आहे.
भ्रमणभाषने पालकांची जागा घेणे, ही शोकांतिका ! – Supreme Court
(म्हणे) ‘पंतप्रधानांनी प्रश्नपत्रिका फुटीचे उत्तरदायित्व निश्चित केलेच नाही !’ – Congress
Siliguri Corridor : सिलीगुडी कॉरिडॉर आता ‘चिकन नेक’ राहिलेला नाही, तर ‘एलिफंट्स ट्रंक’ बनला !
सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले !
PM MODI NEET Paper Leak : शिक्षण सचिवांचे स्थानांतर : नवा कायदाही करणार !
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !