Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’

जंतरमंतरवरील आंदोलनावर बांगलादेशाच्या सरकारचे फुकाचे वक्तव्य

बांगलादेशाच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री शमा उबैद

ढाका (बांगलादेश) – भारतात चालू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाविषयी ऐकले आहे. बांगलादेश सरकारची इच्छा आहे की, आमच्या प्रदेशात शांतता अन् स्थैर्य नांदावे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत देश त्यांच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल आणि परिस्थिती निवळण्यासाठी तातडीने पावले उचलेल, अशी आमच्या सरकारला आशा आहे, अशी प्रतिक्रिया बांगलादेशाच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री शमा उबैद यांनी जंतरमंतर येथे चालू असलेल्या तथाकथित विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर व्यक्त केली. दुसरीकडे पाकिस्तान सरकारने देहलीतील आंदोलनांवर भाष्य करणे टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

बांगलादेशातील अनेक विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनांना पाठिंबा दर्शवला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश व्यतिरिक्त, श्रीलंका आणि नेपाळ या देशांमधील माध्यमांनीही भारतातील युवकांच्या नेतृत्वाखालील आंदोलनांना ठळकपणे प्रसिद्धी दिली आहे.

संपादकीय भूमिका

ज्या देशात अनेकदा लोकशाहीच्या चिंधड्या उडवण्यात आल्या आणि २ वर्षांपूवीही तथाकथित विद्यार्थ्यांनी जो काही हिंसचार केला, त्या देशाचे सरकार भारताला सल्ला देते, यापेक्षा मोठा विनोद कोणता ?