
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ जुलैच्या मध्यरात्री दिलेल्या व्हिडिओ संदेशात ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीसंदर्भातील उत्तरदायित्व निश्चित केले नाही. तसेच विद्यार्थ्यांची आंदोलने किंवा त्यांच्यावर करण्यात आलेली पोलीस कारवाई यांचाही कोणताच उल्लेख केला नाही, असे आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांनी कितीही भाषणे केली, तरीही समस्येवर उपाय शोधण्यासाठी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवणे, विद्यार्थ्यांना मारहाण करणार्यांना शिक्षा करणे आणि क्षमायाचना करणे, या ३ गोष्टी करणे आवश्यक आहे.
रमेश पुढे म्हणाले की, गेल्या दोन मासांतील प्रचंड जनक्षोभामुळेच पंतप्रधानांना सत्य मान्य करणे भाग पडले. तथापि याच कारणामुळे विद्यार्थ्यांचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा आपल्या राजकीय लाभाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. (‘जगा शिकवी ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडी पाषाण’, या वृत्तीची काँग्रेस ! – संपादक)
भ्रमणभाषने पालकांची जागा घेणे, ही शोकांतिका ! – Supreme Court
Siliguri Corridor : सिलीगुडी कॉरिडॉर आता ‘चिकन नेक’ राहिलेला नाही, तर ‘एलिफंट्स ट्रंक’ बनला !
सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले !
PM MODI NEET Paper Leak : शिक्षण सचिवांचे स्थानांतर : नवा कायदाही करणार !
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !